प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
सांगली
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत ग्रामीण भागातील विजाभज प्रवर्गातील लाभार्थीसाठी व भटक्या जमाती-क धनगर समाजातील लाभार्थीसाठी वैयक्तिक घरकुल योजना सुरु करण्यात आल्या आहेत. या योजनेंचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थींनी संबित ग्रामपंचायत व पंचायत समितीमार्फत अर्ज करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर यांनी केले आहे.
योजनेच्या अटी, शर्ती व अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांचे कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जुना बुधगाव रोड, सांगली, दूरध्वनी क्रमांक 0233-2374739 येथे संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. चाचरकर यांनी केले आहे.


