• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 2, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home Uncategorized

संविधान सप्ताहासाठी शरद पवार,रामदास आठवले,नागराज मंजुळे यांना आटपाडीत आणणार

प्रभात क्रांती by प्रभात क्रांती
September 25, 2022
in Uncategorized
0
संविधान सप्ताहासाठी शरद पवार,रामदास आठवले,नागराज मंजुळे यांना आटपाडीत आणणार
0
SHARES
647
VIEWS

देणगी – बचतीचा डबा संस्कृती विकसीत करा
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी

आटपाडी येथे संपन्न होणाऱ्या संविधान सप्ताहाच्या निमित्ताने उदघाटन आणि समारोपाच्या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय नेते खासदार शरदचंद्रजी पवार साहेब, केंद्रिय मंत्री ना. रामदास आठवले, चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे वगैरे मान्यवर महोदयांना आणण्याचा निर्धार करण्यात आला .
दि.२० ते २६ नोहेंबर या दरम्यान संपन्न होणाऱ्या आठव्या संविधान सप्ताह आयोजनाच्या पहिल्या बैठकीत विविध विषयांवर विपूल चर्चा करण्यात आली . बैठकीच्या अध्यक्ष स्थानी फुले – शाहू – आंबेडकर विचार मंचचे अध्यक्ष तथा रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे सांगली जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात हे होते .
संविधान सप्ताह साजरा करताना गेल्या ७ वर्षात सर्वसमावेशक भूमिका बजावली असून असा सप्ताह साजरा करणारा आटपाडी तालुका राज्यातच नव्हे तर देशात एकमेव आहे . असे स्पष्ट करून राजेंद्र खरात यांनी सर्व सुचनांचा आदर करीत यावर्षीचा सप्ताह राष्ट्रीय नेते खासदार शरदचंद्रजी पवार, केंद्रीय सामाजिक कार्य राज्यमंत्री ना. रामदास आठवले साहेब, ख्यातनाम चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना आमंत्रित करून साजरा करण्याचा आपला मानस असल्याचे राजेंद्र खरात यांनी स्पष्ट केले .
प्रबोधन चळवळीत काम करणाऱ्या आटपाडी तालुक्यातील प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरी प्रतिदिनी पैसे संकलीत करणारा बचतीच्या देणगीचा डबा ठेवल्यास प्रत्येक जण प्रतिदिनी त्यात एका चहाचे पैसे टाकु लागल्यास वर्षाला १८०० रुपये जमवू शकेल . अशा शेकडोंच्या छोट्या बचतीतून लाखो रुपये संकलीत होतील त्यातून असे अनेक उपक्रम साजरे होतीलच , त्यादृष्टीने देणगीचा छोटा बचतीचा डब्बा हा उपक्रम सर्वांनी राबवावा . असे स्पष्ट करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश महासचिव सादिक खाटीक यांनी, अभ्यासू, जाणकार, उत्कृष्ट भाषण कला असणारे, श्रोत्यांत राज्यभर प्रिय असणारे, वक्ते आमंत्रित कराच तथापि राज्य देशभर नावलौकीक असणाऱ्या सर्वमान्य, प्रतिभावंताना, उद्घाटक, प्रमुख अतिथी, अध्यक्ष म्हणून आमंत्रीत करावे. असे आवाहन ही सादिक खाटीक यांनी केले .
प्रा.डॉ.रामदास नाईकनवरे यांनी सर्वांना सामावून घेऊन सांघीक विचाराने प्रत्येक पाऊल टाकावे असे सुचित केले.
प्रा.बालाजी वाघमोडे यांनी सप्ताहाच्या मूळ उद्देशाने बगल न देता सर्व उपक्रम राबवावेत तर प्रा. संताजी देशमुख यांनी कोणताही भेद न ठेवता सर्वांचा सन्मान होईल या हृष्टीने सर्वांची पाऊले पडावीत असे स्पष्ट केले .
सेवानिवृत्त शिक्षक स.नि.पाटील यांनी केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांच्या माध्यमातून संविधान सप्ताह समितीला आर्थिक स्थैर्य प्राप्त व्हावे यासाठी राजेंद्र खरात यांनी प्रयत्न करावेत असे आवाहन केले .
दादासाहेब वाघमारे बनपूरी , दत्ता कांबळे शेटफळे, किरण सोहनी गोमेवाडी, संजय हेगडे आवळाई, नारायण जावीर, समाधान ऐवळे, दीपक प्रक्षाळे, सुरेश मोटे आटपाडी , धनंजय वाघमारे झरे, विद्याधर कांबळे करगणी, जनार्धन मोटे बोंबेवाडी इत्यादींनी आपल्या सुचना केल्या .
यावेळी समाधान खरात, आण्णा भोरे ,दादासाहेब कदम, विलास धांडोरे, शशिकांत मोटे, प्रा . चंद्रकांत हुलगे, विशाल काटे इत्यादी उपस्थित होते .
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक रणजीत ऐवळे यांनी केले तर आभार लक्ष्मणराव मोटे यांनी मानले .

e

Related Posts

Uncategorized

मतदारयादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत
मतदारयादीत नाव नोंदणीसाठी अर्ज करा – तहसिलदार प्रदीप उबाळे

November 7, 2022
Uncategorized

प्रारूप मतदार यादीतील तपशीलाच्या अचूकतेबाबत मतदारांनी खात्री करा – जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

November 7, 2022
Uncategorized

घरकुल योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन

November 5, 2022
Uncategorized

शुभ मंगल सामुहिक विवाह योजनेचा लाभ घ्यावा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एस.जी. पवार

November 5, 2022
मुले पळवणारी टोळी ही अफवा!
Uncategorized

मुले पळवणारी टोळी ही अफवा!

September 25, 2022
सौ.सुमन शिंगाडे यांचे निधन
Uncategorized

सौ.सुमन शिंगाडे यांचे निधन

September 25, 2022
Next Post
शिक्षण परिषदेत गुरुजनही खेळले,बागडले!

शिक्षण परिषदेत गुरुजनही खेळले,बागडले!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • मतदारयादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत
    मतदारयादीत नाव नोंदणीसाठी अर्ज करा – तहसिलदार प्रदीप उबाळे
  • प्रारूप मतदार यादीतील तपशीलाच्या अचूकतेबाबत मतदारांनी खात्री करा – जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी
  • घरकुल योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन
  • शुभ मंगल सामुहिक विवाह योजनेचा लाभ घ्यावा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एस.जी. पवार
  • मुले पळवणारी टोळी ही अफवा!

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक

ताज्या बातम्या

  • मतदारयादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत
    मतदारयादीत नाव नोंदणीसाठी अर्ज करा – तहसिलदार प्रदीप उबाळे
  • प्रारूप मतदार यादीतील तपशीलाच्या अचूकतेबाबत मतदारांनी खात्री करा – जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी
  • घरकुल योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन
  • शुभ मंगल सामुहिक विवाह योजनेचा लाभ घ्यावा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एस.जी. पवार
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In