प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
कडेगांव
डॉ.जी.डी.पोळ फाऊंडेशन, खारघर, नवी मुंबई येथे देशाचा ७५ वा अमृत मोहत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी संस्थेचे ध्वजारोहण समारंभ चेअरमन डॉ. गजानन पोळ यांचे हस्ते करण्यात आले. या वेळी संस्थेच्या ट्रस्टी सौ कल्पना पोळ, डॉ. कविता पोळ- नलावडे, डॉक्टर सारंग नलावडे, वाय.एम.टी. आयुर्वेदिक कॉलेजचे प्राचार्य डॉ संजीव यादव यांची प्रमुख उपस्थिती होती.
ध्वजारोहनानंतर संस्थेचे चेअरमन डॉ. जी.डी. पोळ हे आपल्या मार्गदर्शन पर भाषणात म्हणाले की आमच्या सांगली-सातारा परिसरातील प्रतीसरकारने देशासाठी मोठा लढा उभा केला होता. त्या काळी नाना पाटलांनी स्थापन केलेल्या प्रतीसरकारची इंग्रज राजवटीने आणि फुटीरवाद्यांनी इतकी मोठी धास्ती घेतली होती की प्रतीसरकार हे पुढे पत्रीसरकार या नावाने ओळखले जाऊ लागले क्रांतीसिंह नाना पाटील,क्रांतीवीर नागनाथ (अण्णा)नायकवडी, क्रांतीअग्रनी जी.डी.(बापू)लाड,पांडू मास्तर, हनुमंतवडीयेचे भगवान (बप्पा) पाटील,कुंडलचे कॅप्टन रामचंद्र(भाऊ)लाड, तोंडोलीचेबापू मास्तर,वांगी चे एकनाथ मोहिते-पाटील,तडसरचे रा.तू.पाटिल,दुधोंडीचे नलवडे गुरुजी,येडे येथील विष्णू(गुरुजी)काळेबाग, वांगीचे शाहिर शंकरराव निकम,यांचा त्याग मोठा होता.
शेनोली स्टेशनला लुटलेला इंग्रजांच्या खजिन्यातून प्रतीसरकारने शस्त्रास्त्रे खरेदी केली. आणि ती इंग्रजांविरुद्धच्या लढाईत वापरली आज मी बरेच देश फिरलो आहे.ब्रिटनला सुद्धा गेलो होतो.तेथील प्रगती बघता माझ्या हे लक्षात आलं की भारताला सोने की चिडिया का म्हणत जात होतं.भारतातील किती संपत्ती लुटली गेली आहे. या इंग्रजांनी भारतावर दीडशे वर्षे राज्य करून लुटून नेलेली संपत्ती किती असेल त्याचाही विचार करण्याजोग होतं. आज ही प्रतिसरकारच्या आठवणींचा वारसा आमच्यातील युवा पिढी जपत आहे.याचा आम्हाला अभिमान आहे. आपण आपल्या डॉ. जी. डी. पोळ फाऊंडेशन माध्यमातून आदिवासी पाड्यावाड्या-वस्तीवर जेवढी मदत आरोग्यसेवेची करता येईल तेवढी पोहोचवण्याचे काम आपण करणार आहोत.यासाठी सर्वांनी एकत्र काम करणे गरजेचे आहे. यावेळी वाय. एम. टी डेंटल कॉलेजचे प्राचार्या डॉ. मेघना वांदेकर, वाय एम. टी. होमिओपॅथिक कॉलेजचे प्राचार्या डॉ. पागे मॅडम, वाय एम. टी. फिझिओथेरेपी कॉलेजचे प्राचार्य डॉ एझील मॅथीव वाय. एम. टी स्कूल ऑफ नर्सिंगचे प्राचार्या शैलजा दाते. संस्थेचे एच. आर विभाग प्रमुख श्री जयवंत चन्ने, पॉवर मराठी न्यूजचे शिवाजी मोहिते, पत्रकार शिवराज मोहिते, धनाजी मोहिते, रणजीत जाधव, सुहास गावकर,ईश्वर जाधव, प्रशांत गोडसे, दादासाहेब जाधव,शनिदास शिरतोडे, यांचेसह सर्व विभागांचे विभागप्रमुख सर्व कॉलेजचे कार्यालयीन अधिक्षक निबंधक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थीं-विध्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

