अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
जत
लोहगाव (ता. जत) येथे विमल धोंडीराम कोडग यांचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी २ लाख, ५ हजार, ७०० रुपयेंचा ऐवज लंपास केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की,विमल धोंडीराम कोडग यांच्या पतीचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले आहे.काही अंतरावर त्यांचा मुलगा राहत असून विमल कोडग यांना ताप आल्याने त्या आपल्या मुलाच्या घरी झोपण्यासाठी गेल्या होत्या.याचा फायदा अज्ञात चोरट्यांनी घेत विमल कोडग यांच्या घराचा दरवाजा फोडून घरात प्रवेश केला व घरातील कपात तोडून कपाटातील मंगळसूत्र दीड तोळे,बोरमाळ दीड तोळे,कानातील अर्धा तोळे जुपक्के, पाच ग्राम वेल व चांदीचे दागिने ,जोडवी १० भार असा ऐवज लंपास केला आहे.असा एकूण २ लाख, ५ हजार, ७०० रुपयेंचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. विमल या पहाटे घरी गेल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला.या बाबतची फिर्याद जत पोलीस ठाण्यात दिली आहे.अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक लवटे करीत आहेत.



