प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
आटपाडी तालुक्यातील आवळाई येथील एका विवाहित महिलेच्या छळ प्रकरणी सात जणांवर आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजशेखर दिलीप तोरणे, सुलोचना दिलीप तोरणे, दिलीप काशिनाथ तोरणे, स्वप्नाली अंकुश केंगार, आरती आत्माराम पारसे, रेश्मा दिलीप तोरणे, अर्चना श्रीकांत जावीर (सर्व राहणार विक्रोळी पार्क साईट संजय गांधी नगर सेवागिरी सोसायटी वेस्ट मुंबई) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, राजशेखर दिलीप तोरणे याने २७ वर्षीय तरुणीशी लग्न करून तिला त्याचे घरी नांदविण्यास घेऊन न जाता एका भाड्याच्या खोलीत ठेवले. त्याचे इतर महिलेशी अनैतिक संबंध ठेवून ते माहित झाल्यानंतर विचारणा केली असता मारहाण करून मानसिक व शारीरिक त्रास दिला. तसेच फिर्यादीच्या नातेवाईकाकडून ५० हजार रुपये रक्कम घेऊन फसवणूक करून यातील संशयित आरोपीच्या घरी गेले असता इतर संशयित आरोपींनी विवाहितेस घरात न घेता तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ करून घरातून हाकलून दिले, अशा स्वरूपाची फिर्याद आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये दिली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चोरमुले करीत आहेत.



