अनिल मदनेे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
जत
जत शहरातील गंधर्व नदीवरील लोखंडी पूल हा १९१२ मध्ये बांधण्यात आला असून १०० वर्षापूर्वीचा असून त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते राहुल शिंदे यांनी जत नगरपरिषदेकडे जून २०२१ मध्ये केली होती. त्या पत्राच्या अनुषंगाने नगरपरिषद प्रशासनाने वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगकडून मार्च २०२२ मध्ये स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. त्या ऑडिटनुसार लोखंडी पूल अवजड वाहतूकीसाठी वापरण्यास अयोग्य असल्याचा अहवाल वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या समितीने दिला आहे. हा लोखंडी पूल जत शहराच्या मुख्य बाजारपेठेला जोडणारा शहराचा मुख्य दुवा आहे.शहरातील बाजारपेठ अंतर्गत सर्वच वाहतूक या पुलावरून होत असते. कोणताही अनुसूचित प्रकार घडण्यापूर्वी नगरपरिषदेने अहवालाच्या अनुषंगाने नवीन पुलाच्या उभारणीसाठी योग्य ती कार्यवाही तातडीने करण्याची मागणी सामजिक कार्यकर्ते राहुल शिंदे यांनी केली आहे.

