संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
माळशिरस
माळशिरस तालुक्यातील गोरडवाडी येथे श्री संत बाळूमामा यात्रा उत्सव-भंडारानिमित्त बुधवार दि. २४ व २५ ऑगस्ट रोजी विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमासाठी ह.भ.प.कोंडीबा महाराज शिरूर ,ह.भ.प.अजिनाथ महाराज जळभावी,ह.भ.प.नागा बाबा महाराज, बापू हातनर कारभारी,ह.भ .प. टेलर महाराज कुर्डूवाडी व बाळूमामा देवस्थान गोरडवाडीचे पुजारी ह.भ. प.बाळू मामा कोळेकर यांच्या शुभहस्ते कार्यक्रम संपन्न होणार आहे.
बुधवार २४ ऑगस्ट रोजी पहाटे ५ वाजून १५ मिनिटांनी अभिषेक,सायंकाळी ६ ते ७ ह . भ .प . गणेश महाराज गोरड यांचे प्रवचन होणार आहे .सायंकाळी ८ ते ४ ओवीकार मंडळ कार्यक्रम कै.कलावती बिरा गोरड यांच्या स्मरणार्थ धुळा बीरा गोरड यांच्या सौजन्याने बिरोबा ओविकार मंडळ गोरडवाडी,मायाक्का ओविकार मंडळ जळभावी,मायाक्का भोसले व ओविकार मंडळ सांगोला ,भोजलिंग व ओविकार मंडळ जांभुळणी यांचा ओव्याचा कार्यक्रम होणार आहे.
गुरुवार २५ ऑगस्ट रोजी सद्गुरु ह .भ. प . कोंडीबा महाराज शिरूर यांचे शुभहस्ते पालखी पूजन व सकाळी ९ ते ३ दिंडी मिरवणूक तसेच दुपारी १२ ते ५ गजी ढोल कार्यक्रम, बिरोबा तरुण गजी मंडळ गोरडवाडी ,देव्हारा गजी मंडळ गोरडवाडी तसेच ओवीकार मंडळ धुळदेव ,ओवीकार मंडळ पिंपरी .सायंकाळी ९ ते ११ या वेळेत ह . भ. प . दशरथ महाराज गोरड यांचे कीर्तन होणार आहे तसेच दि २४ व २५ रोजी प्रसादाचा कार्यक्रम दुपारी २ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत होईल .तरी या कार्यक्रमाचा लाभ सर्वांनी घ्यावा,असे आवाहन गोरडवाडी ग्रामस्थांनच्या वतीने करण्यात आले आहे.



