
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
दै.’प्रगल्भनायक’ चे संपादक लक्ष्मणराव खटके यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा फेटा, शाल, पुष्पगुच्छ, श्रीफळ देवून खानापूर -आटपाडीचे माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख यांनी सत्कार केला आणि शुभेच्छा देत अभिष्टचिंतन केले.
श्रीमंत बाबासाहेब देशमुख शेतकरी सहकारी सुतगिरणीच्या कार्यस्थळावर हा वाढदिवस साजरा करताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशचे महासचिव सादिक खाटीक, ज्येष्ट साहित्यिक, कवी व ज्येष्ठ नागरिक संघटनेचे सल्लागार अरविंद चांडवले, उद्योजक सुरेश बालटे, चि.शाहूराजे हर्षवर्धन देशमुख हे उपस्थित होते. या मान्यवरांकडून लक्ष्मणराव खटके यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले.



