संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
माळशिरस माळशिरस तालुक्यात शेतात काम करत असताना घोणस आळी चावलेल्या महिला शेतकऱ्यास रुग्णालयात दाखल करण्यात आले.त्यांना अळी चावलेल्या ठिकाणी दुखू लागले व मळमळ सुरू झाली.त्यानंतर त्यांना डॉक्टर
डॉ.मच्छिंद्र गोरड यांनी योग्य उपचार करण्यात आले.तो रुग्ण लवकर बरा झालेला आहे.
घोणस आळीबाबत माळशिरस तालुक्यातील सर्व भागात चर्चा होत आहे. त्यामुळे शेतकरी व मजूर वर्गात गैरसमज व भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ओळख- ह्या अळीच्या १३३ फॅमिलीपैकी ९ फॅमिली गंभीर पॅथोफिजोलोजीकल परिस्थिती निर्माण करतात. अळी पंतग अतिशय संथ असतात. त्यामुळे परभक्षी कडून स्वतःचे संरक्षण होणेसाठी भडक रंग, त्यावर टिपके व अंगावर काटे विकसित केलेले असतात. या काट्यांमध्ये विष असते.
वावर व पिक
ही अळी प्रामुख्याने ऊस,एरंडीआंबा,केळी, डाळीब,लिंबूवर्गीय फळे,देशी बदाम, तणे,कापुस,मुग,शेवगा, शोभेची झाडे यावर आढळून येते.ह्या अळ्या पानाचा भाग कुरतडून खातात. प्रार्द्रूभावामुळे नुकसान पातळी कमी असते. मनुष्य किंवा प्राणी यांचा संपर्क आल्यास मधमाश्या ज्याप्रमाणे स्वसंरक्षणार्थ डंख मारून काट्याद्वारे विष सोडतात, त्याप्रमाणे ही अळी अंगावरील काट्याद्वारे विष सोडते व काटा कातडीत रुतून राहतो.
या विषामुळे तीव्र जळजळ होणे,पुरळ उटणे,सुज,मळमळ,ॲलजी असेल तर श्वासनास त्रास (दूर्मिळ लक्षण ) इत्यादी लक्षणे तास-दोन तास दिससात.पंरतू जीवीत हानी होत नाही, हा समज काढून टाकणे गरजेचे आहे.-सतीश कचरे,तालुका कृषी अधिकारी
उपचार
१ डंख ठिकाणचा काटा चिकटपट्टी लावून काढून टाकावा.
२ – जागा साबनाने स्वच्छ धुवावी व कोरडी करावी.
३ – जागेवर रबीग अल्कोहोल लावावे.
४- कॅलामाइन लोशन क्रीम लावावी.
५ -डंख ठिकाणी बर्फाचा तुकडा ठेवावा म्हणजे जळजळ थांबेल.
६ -शेतात काम करणाऱ्यांनी पूर्ण अंगभर कपडे परिधान करावीत.
७ – डंख ठिकाणी खाण्याचा सोडा व पाणी मिश्रण लावावे.
८ – डॉक्टरांचा सल्ला व उपचार करावेत.
डॉ.मच्छिंद गोरड



