
स्वीफ्ट व दुचाकीची समोरासमोर धडक,चालक फरार
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
दिघंची
कराड-पंढरपूर महामार्गावर दिघंचीपासून २ किमी अंतरावर आटपाडी मार्गावर साळशिंगमळा येथे स्वीफ्ट व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,आटपाडीहून दिघंचीकडे स्वीफ्ट गाडी (क्रमाक एम.एच.१४ डीटी ५७४६) व दिघंचीहून आटपाडीकडे दुचाकी (क्रमांक एम.एच. १० सीई ५८८४) यांची साळशिंगमळा येथे समोरासमोर धडक झाली.यामध्ये मोटारसायकल चालवत असलेला वैभव जालिंदर गिड्डे (रा.तडवळे या.आटपाडी, वय २६ वर्षे) हा युवक जागीच ठार झाला.स्विफ्ट चालकाने भीतीने तेथून तातडीने पलायन केले.ही घटना रविवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास घडली.घटनास्थळी आटपाडी पोलीस तातडीने दाखल झाले.



