संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
माळशिरस
आत्मनिर्भर ‘स्वयंपूर्ण ‘छोटे छोटे उद्योजन निर्माण करणे व चालू उद्योगाची क्षमता वाढविणे ‘ शेतकऱ्यांच्या पिकाला चांगला भाव मिळविणे,जास्त उत्पादनावेळी बाजारभाव टिकविणे, रोजगाराच्या संधी उपलब्ध व वाढविणेसाठी ३० ऑगस्ट रोजी सकाळी ११.०० तालुका कृषि अधिकारी कार्यालय माळशिरस येथे पंतप्रधान सुक्ष्म अन्न प्रक्रिया उदयोग तालुका स्तरीय प्रशिक्षण आयोजित केले आहे. या प्रशिक्षणास उदयोग उभारण्याची इच्छा असलेले नव उदयोजक वैयक्तिक लाभार्थी, आत्मा गट, स्वयंसहाय्यता गट, कृषि उत्पादक कंपनी, कृषि अधिकारी कर्मचारी यांचे प्रशिक्षण कृषि विज्ञान केंद्र मोहोळ प्रक्रिया उद्योग तज्ञ सी. ए . बँक अधिकारी खुपसे जिल्हा महिती प्रकिया उदयोग व उपविभागीय कृषि अधिकारी पंढरपुर यांचे प्रमुख उपस्थितीत आयोजित केले आहे, तरी गरजूंनी उपस्थित राहणेचे आवाहन तालुका कृषी अधिकारी माळशिरस सतीश कचरे यांनी केले आहे.



