प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
सांगली/कोल्हापूर
केंद्रीय विधी व न्याय राज्यमंत्री सत्यपाल सिंह बघेल यांना धनगर आरक्षण प्रश्नाबाबत यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे कि, महाराष्ट्र राज्यातील धनगर समाज राज्यघटनेतील तरतुदीनुसार अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट आहे . संविधान लागू होऊन ७२ वर्ष पूर्ण झाली . नुकताच आपण मोठ्या उत्साहात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला . परंतु महाराष्ट्रात राहणारा धनगर समाज आजही आपल्या हक्काच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणापासून वंचीत आहे . प्रामुख्याने हा समाज डोंगर दऱ्या खोऱ्यात अत्यंत बिकट व गरीब परिस्थितीत आपले जीवन जगत आहे . महाराष्ट्रातील धनगर समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनुसूचित जमाती आरक्षणाचा लाभ व सवलती तत्काळ लागू कराव्यात .
सन १९७६ मध्ये संसदेत बिल क्र १०८ दि.२०/०९/१९७६ रोजी विधेयक पारीत झाले आहे . त्यामध्ये महाराष्ट्रातील धनगरांना अनुसूचित जमातीचा आरक्षण कायदा पारीत झाला आहे . महाराष्ट्र शासन समाजकल्याण विभागाने पत्र क्र.सी.बी.सी. १०५९ / ५८६११ /दि. २८/०६ /१९६६ रोजी केंद्र शासनास सहमती कळवली आहे . त्यामध्ये क्र ३६ वरील धनगर / ओरान / घनगड अशा ३५ उपजातीचा समावेश आहे . महाराष्ट्रातील जिल्हा परिषद – पंचायत समिती अधिनियमामध्ये अनुक्रमांक ३६ वर ओरान / धनगर असा आज अखेर उल्लेख आहे . तत्कालीन प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांनी घटनेमध्ये प्रिंटींग मिस्टेक ( छपाईतील किरकोळ त्रुटी ) मुळे एखादया जमातीस अथवा समाजास सवलती देता येत नव्हत्या , यासाठी एन . व्यंकटचल्लया यांच्या अध्यक्षतेखाली घटना पुर्नअवलोकन आयोगाची स्थापना केली होती . या आयोगाच्या शिफारसीनुसार संसदे मध्ये महाराष्ट्रातील धनगरांचे स्पेलींग ओरान / धनगड यामध्ये दुरूस्ती होऊन केंद्रसरकारच्या अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये क्र . ३६ वर ओरान , धनगड / धनगर असा उल्लेख झाला आहे .
देशातील बिहार , मध्यप्रदेश , उत्तर प्रदेश , झारखंड , हिमाचल प्रदेश , कर्नाटक , ओरीसा यासह अन्य राज्यांतील धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळालेले आहे . मात्र महाराष्ट्रातील धनगर समाजाला भारतीय राज्यघटनेने दिलेले आरक्षण अजून मिळालेले नाही . सबब आपण यामध्ये लक्ष घालून , माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी यांच्या सहकार्याने महाराष्ट्रातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती लागू करण्यासाठी प्रयत्न करावेत कृपया महाराष्ट्रातील धनगर आरक्षण प्रश्न सोडवण्यासाठी आपण लक्ष घालून आरक्षणाचा प्रश्न सोडवून समाज बांधवांवर होणारा अन्याय दुर करावा.हि विनंती.शिष्टमंडळात संस्थापक अध्यक्ष मा. श्री. संजय वाघमोडे, प.महाराष्ट्र अध्यक्ष कैलास काळे, जिल्हा उपाध्यक्ष अमोल मेटकर, जिल्हा संघटक पिंटू गावडे अरुण फोंडे, युवा नेते सचिन नांगरे, हातकणंगले तालुका अध्यक्ष यशवंत वाकसे,संपर्क प्रमुख बाजीराव चोपडे, शिरोळ तालुका अध्यक्ष दादासो गावडे, राधानगरी तालुका अध्यक्ष सुनील शेळके, करवीर तालुका अध्यक्ष बाळासाहेब कोळेकर, कागल तालुका अध्यक्ष संदिप हजारे, पत्रकार बाळासो कोळेकर,डॉ.लक्ष्मण करपे इत्यादी उपस्थित होते.


